अभिमन्यू पवारांच्या वक्तव्याने खासदार मेधा कुलकर्णी रडल्या

MP Medha Kulkarni broke down in tears

पुणे : प्रतिनिधी : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत सारथीच्या कार्यक्रमात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरं दिसत नाही’ या वक्तव्याने मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले. या घटनेने भाजप मध्ये मराठा आणि ब्राह्मण वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. (MP Medha Kulkarni broke down in tears)

पुणे येथे सारथी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत खूर्चीवर बसण्यावरुन आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात वाद झाला. त्याचा राग अनावर झाल्याने त्या कार्यक्रमातून निघून गेल्या.

मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरे दिसत नाही

मराठ्याच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरे दिसत नाही असे आमदार पवार म्हटल्यानंतर खासदार कुलकर्णींना अश्रू अनावरण झाले. त्याबद्दल खासदार कुलकर्णी म्हणाल्या. कार्यक्रमाच्यावेळी पहिल्या रांगेत काही खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी मला पुढच्या रांगेत बसा असे म्हणत होते. पण नरेंद्र पाटील तिथे बसतील असे मी सांगितलं. परंतु अभिमन्यू पवारांना तिथे बसायचे होते. त्यामुळे त्यांची धावाधाव सुरू होती. अभिमन्यू पवार मला म्हणाले, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे. तुम्ही तिथे बसल्यावर वाद निर्माण होईल. (MP Medha Kulkarni broke down in tears)

इथं जातीय विषय येतो कुठे?

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केली जाते. जात बघून केली  जात नाही. मग इथं जातीय विषय येतो कुठे. निवडणुकीत माझी तब्येत ठीका नसतानाही अभिमन्यू पवारांच्या प्रचारासाठी ब्राह्मण समाजाचा मेळावा घेतला होता. ब्राह्मण समाजाला पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते.

अभिमन्यू पवार अजुनही फडणवीसांचे ओएसडी समजतात का अशी टीका कुलकर्णी यांनी केली. पवार हे स्वत:ला सुपेरियर व्यक्ती समजत आहेत. सगळ्या गोष्टी पवारांना त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत. पवारांच्या पोटात होतं, ते ओठावर आले.

अभिमन्यू पवारांचा खुलासा

या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी खुलासा केला. ताईंचा गैरसमज झाला आहे. मी एवढेच म्हणालो होती की नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू. मी त्यांना एवढेच बोललो आहे. यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही. (MP Medha Kulkarni broke down in tears)

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा