Mock drill: संरक्षण मॉक ड्रिल करा

Mock drill

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने राज्यांना बुधवारी, ७ मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले. (Mock drill)

या सरावाचे उद्दिष्ट शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत प्रतिकाराची तयारी वाढवणे हे आहे

दरम्यान, रविवारी, भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंटने संध्याकाळी उशिरा ३० मिनिटांसाठी ब्लॅकआउट सराव करण्यात आला.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान समर्थित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हे सराव आयोजित केले जात आहेत. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता.(Mock drill)

दरम्यान, पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.(Mock drill)

पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यातील दोषी आणि हा कट रचणाऱ्यांचा शोध घेण्याचे वचन दिले आहे. या हल्ल्यातील सहभागींना ‘त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे’ धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

  • सरावामध्ये खालील उपाययोजनांचा समावेश
  • हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सक्रिय करणे
  • विद्यार्थ्यांसह नागरिकांना मूलभूत नागरी संरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण देणे
  • क्रॅश ब्लॅकआउट प्रोटोकॉलची अंमलबजावणी
  • महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि प्रतिष्ठानांचे मजबुतीकरण
  • स्थलांतराचा सराव आणि याविषयीच्या योजनांचे अद्ययावतीकरण करणे

    हेही वाचा :
    नेहरूंच्या कानशिलात मारली त्याची गोष्ट!
    तुम्ही फक्त आरोप करा; ईडीला पुन्हा फटकारले

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर