Mitrya PC : पूर आपत्ती नियंत्रणातील ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

Mitrya PC

कोल्हापूर  :  प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणातील ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Mitrya PC)

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा – भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर, सांगली, मिरज – कुपवाड, इचलकरंजी शहरांत हवामान बदलावर आधारित पूर, उष्णतेची लाट, वादळ या सारख्या आपत्तींपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजनेबाबत राज्य शासनाच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत काल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) कडून  ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  (Mitrya PC)

                जागतिक बँकेच्या माध्यमातून .३२०० कोटींचा कोल्हापूर व सांगली पूर नियंत्रण प्रकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये जागतिक बँकेचा ७० टक्के व महाराष्ट्र शासनाचा ३० टक्के हिस्सा असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याच्या निचरा करणे, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नद्या व नाल्यांची उंची व रुंदी वाढविणे, गाळ काढणे, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे मॅन्यूअली करणे आदी कामांचा समावेश आहे. सद्यस्थितीत प्रामुख्याने यातील महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभारणे, सल्लागाराची नियुक्ती करणे, प्रकल्प अंमलबजावणी युनिट साठी प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार नियुक्ती करणे आदी सुमारे९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.   (Mitrya PC)

   या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पुराचे पाणी मराठवाडा, विदर्भ, धाराशिव भागांकडे वळविण्यात येणार आहे. याकरिता सुमारे रु.१० हजार कोटींच्या प्रकल्पावर शासनाचे काम सुरु असून, हाही प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर