Megha Vemuri banned : भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीला दीक्षान्त समारंभात बंदी

Megha Vemuri

वॉशिंग्टन : गाझामधील युद्धाचा निषेध केल्याबद्दल भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीला दीक्षान्त समारंभापासून रोखण्यात आले. पॅलेस्टिनचे समर्थन केल्याप्रकरणी तिला शिस्तभंगाला सामोरे जावे लागले होते. एमआयटीत वर्ग प्रतिनिधी असलेल्या मेघा वेमुरी हिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (Megha Vemuri banned)

वेमुरी यांनी सीएनएनला सांगितले की, तिच्या भाषणानंतर, विद्यापीठाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तिला दीक्षान्त समारंभाची परवानगी नाकारण्यात आली. तसेच कार्यक्रम संपेपर्यंत तिला कॅम्पसमध्ये येण्यास मनाई करण्यात आली.

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच त्यांनी वेमुरीला पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. (Megha Vemuri banned)

शिवाय एमआयटीच्या वरिष्ठांनी, ते वेमुरीला दिलेल्या शिक्षेवर ठाम असल्याचेही सांगितले.

 “एमआयटी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करते, परंतु आम्ही निर्णयावर ठाम आहोत. एखादी व्यक्ती जाणूनबुजून आणि वारंवार आमच्या मंचावरून निषेधाचे नेतृत्व करत असेल तर त्यालाही तसेच प्रत्युत्तर द्यावे लागेल,” असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. (Megha Vemuri banned)

तथापि, वेमुरीला पदवी मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मूळ भारतीय वेमुरीचा जन्म जॉर्जियात झाला. गुरुवारी (२९ मे) केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे झालेल्या वनएमआयटी दीक्षान्त समारंभात नियोजित वक्त्या होती, मात्र ती तेथे केफियेह हे पॅलेस्टिनी समर्थक एकतेचे प्रतीक घालून व्यासपीठावर गेली होती. गाझामधील युद्धाचा निषेध केल्याबद्दल तिने तिच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आणि विद्यापीठाच्या इस्रायलशी असलेल्या संबंधांवर टीका केली.

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार