Manipur Weapons: मणिपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त

Manipur Weapons

Manipur Weapons

इम्फाळ : भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. लष्कर, आसाम रायफल्स आणि अन्य सुरक्षा दलांचा या मोहिमेत सहभाग होता. अशांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांमधून ५० शस्त्रे, दारूगोळ्याचा मोठा साठा आणि युद्धसामग्री जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Manipur Weapons)

सुरक्षा दलांनी राबवलेल्या या शोधमोहिमेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने अद्याप अनेकांनी शस्त्रे टाकली नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यपालांनी शस्त्रे टाकण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक गटांनी शस्त्रे सरकारकडे जमा केली होती. मात्र पुन्हा हा सापडला आहे. (Manipur Weapons)

संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि मणिपूर पोलिसांनी ही मोहीम राबवली. गेल्या ४८ तासांत चांडेल, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधील डोंगराळ आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ही आधारित कारवाई सुरू केली. या मोहिमेत ५० शस्त्रे, इम्प्रुवाइज डिव्हाइसिस, ग्रेनेड, दारूगोळा आणि युद्धसामग्री जप्त केली. (Manipur Weapons)

सुरक्षा दलांनी मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील बंकर देखील उद्ध्वस्त केले. कोकी-झो आणि मेइतेई या दोन्ही सशस्त्र गटांनी हे बंकर उभारले होते.

संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे जप्त केलेल्या ५० शस्त्रांपैकी लष्कर आणि आसाम रायफल्सने डोंगराळ चांदेल जिल्ह्यातील लैजांग भागातून २३ इम्प्रुवाइज मोर्टार (पोम्पी), तीन एके सीरिज रायफल, एक इन्सास रायफल, एक कार्बाइन, दोन मझल लोडेड रायफल, एक ०.३०३ रायफल, पाच पिस्तूल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि युद्धसामग्री जप्त केली. (Manipur Weapons)

थौबल जिल्ह्यातही शस्त्रसाठा सापडला. आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी दोन ९ मिमी कार्बाइन, एक १२ बोर रायफल, एक सिंगल बोर बॅरल रायफल (एसबीबीएल) आणि तीन पिस्तूल जप्त केले. आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई भागातून एक मोर्टार, एक १२ बोर रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले, असे प्रवक्त्याने सांगितले.

आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई दरम्यान, काकचिंग जिल्ह्यातील वांगू भागातून एक कार्बाइन, एक ०.३०३ रायफल आणि दोन सिंगल बॅरल रायफल जप्त केल्या. (Manipur Weapons) जप्त केलेला हा साठा मणिपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांत मोठ्या संघर्षाचा सामना करणाऱ्या मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सुरक्षा दलांचे हे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
आंदोलने दाबून टाकता येणार नाहीत

Related posts

Two locals identified

Two locals identified: दोघा स्थानिकांच्या मदतीने घडविला हल्ला

Pahelgaum attack

Pahalgam attack: दहशतवाद, धर्म आणि राजकारण

Two terrorist killed

Two terrorist killed : दोघा दहशतवाद्यांना टिपले