Mamta attacks : हिंमत असेल तर मला अटक करा : ममतांचे आव्हान

Mamta attacks

कोलकाता : भाजपाशासित राज्यांत बंगाली भाषकांचा छळ सुरू आहे. त्यांना करण्यात येत आहे. बंगालींबद्दलच्या केंद्र आणि भाजपच्या वृत्तीबद्दल मला लाज वाटते. हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (१६ जुलै) दिले. (Mamta attacks)

कोलकाता येथे एका निषेध रॅलीत भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

त्या म्हणाल्या, ‘‘मी आतापासून जास्तीत जास्त बंगाली बोलण्याचा निर्णय घेतला आहे. हिंमत असेल तर मला डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवा.’’(Mamta attacks)

थोडा जरी संशय आला तरी बंगाली भाषिक लोकांना ताब्यात घ्या, अशा आशयाच्या नोटिसा भाजपाशासित राज्यांना गुप्तपणे पाठवण्यात आल्या होत्या. बंगाली भाषिक लोकांना त्रास देण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे, असा आरोप करून त्यांनी आम्ही केंद्र सरकारच्या नोटिसांना आव्हान देऊ, असा इशारा दिला.

केंद्रातील सत्ताधारी सरकार त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी निवडणूक आयोगावरही प्रभाव टाकत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मतदार यादीतून नावे काढून भाजपने महाराष्ट्रात विजय मिळवला, आता बिहारमध्येही तेच करत आहे, असा दावा त्यांनी केला. भाजप बंगालच्या मतदार यादीतून नावे वगळण्याचा डाव रचत आहे. तो डाव उधळून लावू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.(Mamta attacks)

बंगाली भाषिक स्थलांतरित हे रोहिंग्या मुस्लिम आहेत हे सिद्ध करा, असे आव्हानही त्यांनी दिले.

अनेक ठिकाणी बंगाली स्थलांतरितांना बेकायदेशीर स्थलांतरित समजून त्यांचे अटकसत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर