व्हेनेझुएलातील भूकंपात १० हजार ठार झाल्याची भिती

Major earthquake in Venezuela

नवी दिल्ली : व्हेनिझुएला देशाची राजधानी कराकस शहराला बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यात १० हजार जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली आहे. तसेच हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेनंतर व्हेनेझुएलाचे अध्यक्षांनी आणीबाणीची घोषणा केली आहे.

कराकस शहराला बुधवारी सायंकाळी दोन भुकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का ७.१ रिश्टर स्केल क्षमतेचा होता तर दुसरा भुकंपाचा धक्का त्याहून मोठा ७.५ रिश्टर स्केलचा होता. देशात राष्ट्रीय सुट्टी असल्याने बहुतांशी लोक घर होते. शिवाय राजधानी कराकस हे सर्वांधिक लोकसंख्येचे शहर आहे. (Major earthquake in Venezuela)

बुधवारी सायकाळी पहिला धक्का बसल्यानंतर शहरातील इमारती पत्यासारख्या कोसळल्या. सर्वत्र भितीने आवाजाच्या किंकाळ्या ऐकू येऊन लागल्या. लोकांना काय झाले हे कळण्याच्या अगोदर ३९ सेंकदात दुसरा धक्का बसला. लोकांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली. घरे,इमारती पडल्याने त्याच्या खाली हजारो लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Major earthquake in Venezuela)

कराकस शहरात गगनचुंबी इमारती होत्या. भुकंपाने त्या जमिनदोस्त झाल्या आहेत. कराकस शहरात इमारतीचे अवशेष उरले आहेत. देशाचे गृहमंत्री डियोस्डाडो काबेय यांनी कराकस शहरातील अल्तमिरा भागात सर्वाधीक नुकसान झाल्याची माहिती दिली. आणखीन भुकंपाचे धक्के बसू शकतात. त्यामुळे लोकांनी घरी जाऊ नये असे आवाहन सरकारने केले. बुधवारची रात्र नागरिकांवर रस्त्यांवर बसून काढली. या भुकंपाचे हादरे कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत जाणवली. त्रुजिलो, काराबोबो, अरागुआ, ला गुआइरा, याराकुई आणि मिरांडा शहरांना भुकंपाचा धक्का बसला आहे. (Major earthquake in Venezuela)

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा