Earthquake in Russia : रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप, रशिया, जपान किनाऱ्यावर त्सुनामी

Earthquake in Russia

मास्को : रशियातील कामचटका द्वीपकल्पात एका शक्तीशाली भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. महाभुंकपामुळे रशिया आणि जपानच्या सागरी किनाऱ्यावर त्सुनामी आली असून सम्रुदातील लाटा चार मीटर उंचीवर पोहोचल्या आहेत. अनेक इमारती बुडाल्या असून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना घरे सोडून सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप रेकॉर्डमधील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप आहे. (Earthquake in Russia)

रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात बुधवारी ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर जपान आणि रशियाच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा धडकल्या. भूकंपाचे केंद्र होक्काइडोपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर आहे. भुकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. बीएनओ न्यूजने वृत्त दिले आहे की त्सुमानी लाटांमुळे जपानी किनारपट्टीवर चार व्हेल वाहून गेल्या आहेत. (Earthquake in Russia)

जपानच्या राष्ट्रीय प्रसारक एनएचके ने इशारा दिला होता की मोठ्या लाटा येऊ शकतात. जपानच्या हवामान संस्थेने यापूर्वी म्हटले होते की तीन मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उत्तर आणि पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशांना धडकू शकतात आणि ओसाकाजवळील वाकायामापर्यंत दक्षिणेकडे पसरू शकतात. समुद्राखालील या प्रचंड भूकंपामुळे रशिया आणि जपानच्या काही भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात आले. त्सुनामीचे पहिले दृश्य सोशल मिडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये रशियन किनारी इमारती पाण्याखाली गेल्याचे आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.

त्सुनामी लाटांमुळे इमारतींचे नुकसान झाल्यानंतर आणि पूर आल्यानंतर रशियाच्या सुदूर पूर्वेकडील सखालिन प्रदेशातील अधिकाऱ्यांनी बुधवारी उत्तर कुरिल बेटांवर आपत्कालीन स्थिती जाहीर केली.”उत्तर कुरील जिल्ह्यात, जिथे आज भूकंप आणि त्सुनामी आली, तेथे आणीबाणीची स्थिती लागू करण्यात आली आहे,” असे सखालिन सरकारने एका निवेदनात म्हटले आहे. (Earthquake in Russia)

त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर पूर्व रशियाच्या राज्यपालांनी लोकांना ‘किनाऱ्यापासून दूर राहण्याचे’ आवाहन केले आहे.  भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे १९ किलोमीटर खोलीवर होता आणि तो पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराच्या पूर्व-आग्नेयेस सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, त्सुनामीच्या लाटा ४ मीटर उंचीपर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळे अनेक भागात नुकसान झाले. “आजचा भूकंप दशकातील सर्वात मोठा होता,” असे कामचटकाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे, असे रॉयटर्सने म्हटले आहे.

रशियाच्या आपत्कालीन सेवांनी बाधित भागातून स्थलांतर करण्याचे आदेश जारी केले आहेत. कामचटकाच्या दक्षिणेकडील सेवेरो-कुरिलस्क या लहानशा शहरात, त्सुनामीच्या धोक्यामुळे लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले. जपान, हवाई आणि पॅसिफिकच्या इतर भागांसाठी त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

अमेरिकन अधिकाऱ्यांनी गुआम आणि इतर मायक्रोनेशियन बेटांवर त्सुनामी लक्ष ठेवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर लोकांना “सुरक्षित राहण्याचे” आवाहन केले. “पॅसिफिक महासागरात झालेल्या एका मोठ्या भूकंपामुळे, हवाईमध्ये राहणाऱ्यांसाठी त्सुनामी इशारा लागू आहे. अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यासाठी त्सुनामी वॉच लागू आहे. जपान देखील मार्गात आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने मंगळवारी रात्री केप मेंडोसिनो ते ओरेगॉन सीमेपर्यंतच्या उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याच्या १०० मैलांच्या पट्ट्यासाठी त्सुनामीचा तीव्र इशारा जारी केला.

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !