महायुती सरकार अन्यायी : रोहित पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवरायांच्या पुतळा उभारण्यात तसेच लहान मुलांच्या गणवेशातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.   (Rohit Pawar)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही आ. पवार यांनी लक्ष्य केले. एखादा गुरु चांगल्या विचारासाठी, महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी लढला असेल, तर अशा गुरूला विचार जपण्याची गुरुदक्षिणा द्यायला हवी. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी ते विचार जपले नाहीत. त्यांनी आपला पुरोगामी विचार जपला नाही. ते केवळ आपल्या स्वार्थासाठी महायुतीच्या नेत्यांसोबत गेले आहेत.

देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषीत करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र गाईचे खरे संगोपन शेतकरी करतात. दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी काढायला हवी होती. मात्र दुष्काळात पाच महिने एकही छावणी राज्य सरकारने काढली नाही. राज्य सरकार अडचणीत असताना आता त्यांना गोमाता आठवते हे हास्यास्पद आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी