महायुतीने महिलांचा विकास साधला : गोऱ्हे

पुणे : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. महिलांचा विकास साधला. त्याचाच परिणाम म्हणून प्रथमच महिलांची मतपेढी तयार झाली आहे, असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे स्पष्ट केले. विरोधक सत्तेत होते तेव्हा महिलांना दुर्लक्षित केले जात होते, असा आरोपही त्यांनी केला. (Dr. Neelam Gorhe)

महिला बचत गट, शहरांकडे होणारे स्थलांतर, रोजगार हमी, शिक्षणाचे वाढते प्रमाण तसेच महिलांचा सन्मान वाढविणार्‍या विविध योजनांमुळे महिलांना महिलांचा हक्क मिळत आहे, असा दावा त्यांनी केला.

अनेक पीडित महिलांना न्याय देण्याचे काम युती सरकारने केले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे वातावरण बदलले आहे. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे. एकमेकांविषयी बोलताना कोणी अपशब्द वापरल्यास त्यावर निवडणूक आयोग त्याची दखल घेत आहे. ही चांगली गोष्ट आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ