Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारने अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा खाते कायम राहिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण खात्याची जबाबदारी दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते कायम राहिले असून राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Portfolio )

विधिमंडळाचे पहिला अधिवेशन आज (दि.२१) पार पंडले. परंतु, मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांना कोणती खात्याचे मंत्रीपद मिळणार याची चर्चा रंगली होती. शपथविधी सोहळ्याला आठवडा उलटून गेला तरी खातेवाटप झाले नव्हते. अखेर आज (दि.२१) रात्री खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यामध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्री, शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तर शंभूराज देसाई पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण खाती मिळाली आहे. मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खाते आहे. प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण तर आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी आली आहे.

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस, मु‌ख्यमंत्री : गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा वगळून), विधि आणि न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

अजित पवार, उपमुख्यमंत्री : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

चंद्रशेखर  बावनकुळे : महसूल

राधाकृष्ण विखे-पाटील : जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)

हसन मुश्रीफ :  वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज

गिरीश महाजन : जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन

गणेश नाईक : वन

गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा आणि स्वच्छता

दादाजी भुसे : शालेय शिक्षण

संजय  राठोड : मृद व जलसंधारण

धनंजय  मुंडे : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,

मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम

उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा

जयकुमार रावल : विपणन, प्रोटोकॉल

पंकजा मुंडे : पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन

अतुल  सावे : ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि अक्षय ऊर्जा

अशोक उईके : आदिवासी विकास

शंभूराज  देसाई : पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण

ॲड.आशिष  शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक घडामोडी

दत्तात्रय भरणे : क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ

आदिती  तटकरे : महिला आणि बाल विकास

शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

माणिकराव कोकाटे : कृषी

जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायत राज

नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य

संजय सावकारे : वस्त्रोद्योग

संजय शिरसाट : सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक : परिवहन

भरतशेठ गोगावले  :रोजगार हमी, फलोत्पादन, क्षारपड विकास मदत व पुनर्वसन

मकरंद जाधव (पाटील) :मदत व पुनर्वसन

नितेश राणे : मत्स्य व बंदरे

आकाश फुंडकर : कामगार

बाबासाहेब पाटील : सहकार

प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

राज्य मंत्री

आशिष जैस्वाल : वित्त व नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार

माधुरी मिसाळ : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ

पंकज भोयर : गृह (ग्रामीण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खाण

मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास.

योगेश कदम : गृह (शहर), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

बीड जिल्ह्यात पीकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा