SU Softball Team: शिवाजी विद्यापीठ सॉफ्टबॉल महिलांचा संघ रवाना

SU Softball Team

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंध्र प्रदेशात होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ शनिवारी (२६ एप्रिल) रवाना झाला. नेल्लूर येथे ३० एप्रिल ते ३ मे २०२५ येथे स्पर्धा होणार आहेत. (SU Softball Team)

या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर गेले दहा दिवस विशेष एकत्रित सराव शिबिर झाले. या संघात एकूण १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आले. संघामध्ये स्वप्नाली वायदंडे (कर्णधार), करिष्मा कुडचे, ऐश्वर्या पुरी, अंजली पवार, साक्षी येटाळे, मृणाल जाधव, वैष्णवी हुळहुळे, सृष्टी शिंदे, सौंशज्ञा माने, सागरीका म्हातो, सलोनी नलवडे, सृष्टी कदम, अनुजा पाटील, श्रावणी चौगुले, निलोफर गौस, सृष्टी देशमुख यांचा समावेश आहे.

प्रशिक्षकपदी प्रा.विनायक जाधव तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.राम पवार यांची निवड झाली. या संघाला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. (SU Softball Team)

हेही वाचा :
आशियाई ‘ॲथलेटिक्स’साठी भारतीय संघ जाहीर

Related posts

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका

वाढवण बंदर : विकासाचे प्रवेशद्वार की पर्यावरण, मच्छीमारांवर आघात?

एकनाथ शिंदें स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकलेत?