लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार (दि.४) पासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. (Rahul Gandhi)

खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम

४ ऑक्टोबर : सायं.५.३० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान. सायं. ६ : कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम.

५ ऑक्टोबर : दु. १ वा. हॉटेल सयाजी येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान.  दु.१.३० वा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन आणि अभिवादन. त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर. सायं.४ वाजता : हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

Related posts

७५ हजारांची लाच मागणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक

माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त