Kulgaon encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; दहशतवादी ठार

Kulgaon encounter

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी (८ सप्टेबर) संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. चकमकीदरम्या एक लष्करी कनिष्ठ कमिशन अधिकारी (जेसीओ) जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Kulgaon encounter)

दहशतवादी हालचालींबद्दल विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी गुदरच्या जंगलात ही चकमक सुरू झाली. लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफचे जवान या मोहीमेमध्ये सहभागी झाले होते.

‘‘गस्तीवरील जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांना आव्हान देण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे जोरदार गोळीबार झाला ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आणि एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी जखमी झाला,’’ असे लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.(Kulgaon encounter)

जखमी अधिकाऱ्याला ताबडतोब उपचारासाठी श्रीनगरमधील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की तो स्थानिक असल्याचे मानले जाते. पोलिसांनी सांगितले की जंगलात इतर कोणतेही दहशतवादी लपले नाहीत याची खात्री करण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू आहे.(Kulgaon encounter)

नियंत्रण रेषेवरून (LoC) परदेशी अतिरेक्यांच्या नव्याने घुसखोरीच्या गुप्तचर अहवालानंतर सुरक्षा यंत्रणांनी दक्षिण काश्मीरमध्ये बंडखोरीविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. या दरम्यानच ही चकमक झाली. गेल्या काही महिन्यांत, कुलगाम आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये अनेक गोळीबार झाले आहेत ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांत स्थानिक तरुणांचे दहशतवादी कारवायातील सहभागाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील हँडलर्स घुसखोरीसाठी परदेशी तरुणांना पाठवत आहेत.

Related posts

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल