मऊ, गुबगुबीत विविध जातींच्या मांजरांच्या प्रदर्शनाची कोल्हापूरकरांना भुरळ

कोल्हापूर : सध्या शहरीभागात बदलत्या राहणीमानात पाळीव प्राण्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. बहुतांश घरांमध्ये विविध जातींचे मांजर, कुत्रे यासह विविध प्रकारचे पाळीव प्राणी पाहायला मिळतात. लोक या प्राण्यांना घरातील सदस्याप्रमाणे जपत असतात. विशेष म्हणजे बहुतांश लोक मांजर हमखास पाळतात. अशाच विविध मांजरांची रूप पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना रविवारी (दि.१) मिळाली. फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे कॅट शोचे आयोजन करण्यात आले होते.

या शोमध्ये जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असणारी पर्शियन कॅट, क्लासिक लाँग हेअर, बेंगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झॉटिक शॉर्ट कॅट, सैबेरियन कॅट, सियामिस, ओरीवो, भारतीय जातीचे इंडी माऊ, अशा विविध जातीचे सुमापे २०० हून अधिक मांजर महाराष्ट्र, आंध्र,गोवा, कोलकाता, कर्नाटक आदी राज्यांतून प्रदर्शानात आली होती. या प्रदर्शनातील मांजर पाहण्यासाठी कोल्हापुरातील प्राणी प्रेमींनी गर्दी केली होती.

                                                                                                 अगदी ५,००० ते १,००,००० रूपये किमतीपर्यंतचे मांजर या शोमध्ये ठेवण्यात आले होते. या शोमध्ये मांजरांची निगा कशी राखावी तसेच त्यांचे लसीकरण, त्यांचा आहार काय असावा याचीही माहिती देण्यात आली. तसेच मांजराच वजन, त्यांची निगा कशी राखली जाते, आणि मांजर किती चपळ आहे. असे विविध कॅटेगरीत परीक्षण करून त्यांच नंबर ही काढण्यात आले.

कोल्हापुरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळण्याची क्रेझ वाढली आहे. अशातच सर्वात शांत आणि स्वच्छ प्राणी म्हणून मांजराकडे पाहिले जाते. या शोमुळे विविध जातींचे मांजर पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी