Kidambi : श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Kidambi

क्वालालंपूर : भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या भारतीय जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. (Kidambi)

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतसह एचएस प्रणॉय, सतीशकुमार करुणाकरन आणि आयुष शेट्टी यांनी या भारताच्या बॅडमिंटनपटूंनी विजय नोंदवले होते. यांपैकी फक्त श्रीकांतलाच दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आला. त्याने आयर्लंडच्या न्हॅट एनग्युएनला सुमारे तासभर रंगलेल्या लढतीत २३-२१, २१-१७ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हशी होईल. पोपोव्हने दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्याच आयुषवर ५० मिनिटांमध्ये २१-१३, २१-१७ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या फेरीत तृतीय मानांकित खेळाडूला हरवून सनसनाटी निकाल नोंदवणाऱ्या सतीशकुमारचा दुसऱ्या फेरीमध्ये फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हने २१-१४, २१-१६ असा पराभव केला. जपानच्या युशी तानाकाने अवघ्या ३९ मिनिटांमध्ये प्रणॉयला २१-१९, २१-१८ असे नमवले. (Kidambi)

मिश्र दुहेरीमध्ये ध्रुव-तनिशा यांनी फ्रान्सच्या ज्युलियन माइओ-लिआ पॅलेर्मो जोडीवर १ तास ७ मिनिटांमध्ये २१-१७, १८-२१, २१-१५ अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत ध्रुव-तनिशा यांच्यासमोर जिआंग झेन बांग-वेई या शिन या चीनच्या अग्रमानांकित जोडीचे आव्हान आहे. दरम्यान, महिला एकेरीपाठोपाठ महिला दुहेरीतीलही भारताचे आव्हान संपुष्टात आले. प्रेरणा आळवेकर-मृण्मयी देशपांडे या भारतीय जोडीला दुसऱ्या फेरीत सू यिन हुई-लिन झिह यून या तैपेईच्या जोडीने २१-९, २१-१४ असे हरवले. (Kidambi)

हेही वाचा :
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा युवा संघ जाहीर

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !