Kareena Shares Kolhapuri: करीनापाठोपाठ नीना गुप्तांनीही केले ‘कोल्हापुरी’चे प्रमोशन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोल्हापुरी चप्पलचा फोटो पोस्ट करत ‘कोल्हापुरी’चे प्रमोशन केले होते. ‘‘माफ करा प्रादा नाही… पण माझी ओजी कोल्हापुरी, ’’ अशी कॅप्शनही त्याखाली टाकली होती. पारंपरिक कोल्हापुरी चप्पलच्या कारागिरीसाठी तिने या माध्यमातून प्रोत्साहन दिले होते. (Kareena Shares Kolhapuri)

आता करीनापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही आपल्या इंस्टाग्रामवर कोल्हापुरी चप्पलांबद्दलचे वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. नीना गुप्ता त्यांच्या ‘बधाई हो’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. (Kareena Shares Kolhapuri)

या व्हिडिओमध्ये, त्या हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल परिधान करून अभिमानाने मिरवताना दिसत आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना हे चप्पल भेट दिले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे. ‘‘तर, या कोल्हापुरी चप्पलांना आजकाल खूप मागणी आहे. एकदा मी लक्ष्मीकांत बेर्डेसोबत काम केले होते – मला ते नेमके आठवत नाही. मी त्याला विचारले, तू मला कोल्हापूरहून हे चप्पल मिळवून देऊ शकशील का? त्याने हो म्हटले. त्याने माझ्यासाठी ते घेतले. ते अजूनही माझ्याकडे आहे आणि आतापर्यंतचे ते सर्वांत सुंदर चप्पल आहे. सर्वात सुंदर आणि हस्तनिर्मित! मला ते खूप आवडतात. धन्यवाद लक्ष्मीकांत. तू आता नाहीस, लव्ह यू!” (Kareena Shares Kolhapuri)

Kareena Shares Kolhapuri

व्हिडिओच्या शेवटी गुप्ता चप्पल घालून चालताना दिसताता. ती पोस्टला ‘‘रियल तो रियल होता है…’’ अशी कॅप्शनही त्यांनी पोस्टला दिली आहे.

करिना कपूरने तिच्या कोल्हापुरी चप्पलचा फोटो शेअर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नीना गुप्ता यांनी ही पोस्ट केली आहे. करीनाने आपल्या पोस्टमध्ये प्रादावर टीकाही केली होती.

प्रादाने २२ जून रोजी मिलान येथे झालेल्या मेन्स स्प्रिंग/समर २०२६ फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलशी मिळताजुळते सँडल प्रदर्शित केले. मात्र ते पारंपरिक कोल्हापुरीने प्रेरीत आहे, असा साधा उल्लेखही प्रादाने केला नव्हता.

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ

`केडीसीसी` ला रिझर्व बँकेकडून १३ लाखांचा दंड