…आता कल्याण बॅनर्जींचा ममतांना अल्टिमेटम

Kalyan Banerjee's ultimatum to Mamata

नवी दिल्ली : अभिषेक बॅनर्जींच्या वर्तनाला कंटाळून तृणमुल काँग्रेसचे खासदार आणि आमदार सोडून जात असताना ममता बॅनर्जीचे समर्थक कल्याण बॅनर्जी यांनीही आता अल्टिमेटम दिला आहे. कल्याण बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता आम्ही की अभिषेक हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले आहे.  (Kalyan Banerjee’s ultimatum to Mamata)

अभिषेक बॅनर्जी हे ममतांचे नातलग असून त्यांचा पक्षात मोठा दबदबा आहे. पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमुलच्या दारुन पराभवानंतर ६० आमदारांनी तृणमुलच्या विरोधात बंडखोरी केली आहे. तसेच २० खासदारांनी लोकसभेत वेगळा गट करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना सूचना दिली आहे. तीन राज्यसभा खासदारांनी ममतांची सात सोडली असली तरी कल्याण बॅनर्जी यांनी ममतांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी देखील ममताना अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्यात निवड करण्याचा अल्टिमेट दिला आहे. (Kalyan Banerjee’s ultimatum to Mamata)

इंडिया टुडेला दिलेल्या प्रतिक्रिया देताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, मी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर आहे. पण आता त्यांनी निवड करण्याची गरज आहे. हे खूप अपमानास्पद आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वकील बदलण्यात आल्याचे मला सांगितले जाते. त्यांना ज्येष्ठांचा आदर कसा करायचा माहित नाही. अभिषेक यांनी माझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही आणि भविष्यातही ठेवणार आहेत. ते खूप अहंकारी आहेत. त्यांच्यामुळेच पक्षाची ही दुर्दशा झाली आहे असा आरोप केला. (Kalyan Banerjee’s ultimatum to Mamata)

Related posts

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मोदींनी २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ?: हर्षवर्धन सपकाळ

सोने, चांदी नाही, चक्क एक लाख किंमतीचा ४० पोती कांदा चोरला