K. Kavitha suspended : के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी

K. Kavitha suspended:

हैदराबाद : भारत राष्ट्र समिती (BRS)च्या नेतृत्वाला आणि त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असा निर्वाणीचा संदेश देत, मंगळवारी (२ सप्टेंबर) पिंक पार्टीने केसीआर यांच्याच कन्या कलवाकुंतला कविता  (के कविता) यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.(K. Kavitha suspended:)

के कविता यांना भारत राष्ट्र समितीमधून निलंबित करण्याची घोषणा करणारे निवेदन २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस सुप्रीमो के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या सुश्री कविता यांनी त्यांच्या पक्षातील सहकारी आणि जवळच्या नातेवाईकांवर – माजी पाटबंधारे मंत्री टी. हरीश राव आणि माजी खासदार जे. संतोष कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कविता यांच्यावरच कडक कारवाई करण्यात आली आहे. (K. Kavitha suspended:)
पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीच्या सरचिटणीस सोमा भरत कुमार आणि बीआरएस सरचिटणीस टी. रविंदर राव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, केसीआर यांनी त्यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनानुसार, कविता यांचे कृती, वर्तन आणि अलिकडच्या काळात सुरू असलेल्या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेता, त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(K. Kavitha suspended:)

हेही वाचा :
तोडगा… नोटीस… मुंबई सोडणार नाही…

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?