Judge’s Assets: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करणार

Judge's Assets

नवी दिल्ली : पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे.(Judge’s Assets)

१ एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा भारताच्या सरन्यायाधीशांकडे करण्याचा निर्णय घेतला. त्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल, अशी माहिती ‘लाइव्ह लॉ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. (Judge’s Assets)

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करताना न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या आवारात रोख रक्कम सापडल्याच्या कथित वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायाधीशांच्या मालमत्ता जाहीर करण्यासंबंधीची प्रक्रियेला योग्य वेळी अंतिम रुप दिले जाणार आहे.

सध्या, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा केलेली आहे. तथापि, ही घोषणा सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका
मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर  

Related posts

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

Archery Gold : भारताला तिरंदाजीत सुवर्ण

Suicide in Jail : बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या