JK statehood issue: अब्दुल्लांनी मोदींसमोर मांडला राज्याच्या दर्जाचा मुद्दा

Omar rakes up statehood issue

कटरा : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा मुद्दा शुक्रवारी (६ जून) पुन्हा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आयोजित सभेवेळी ते बोलत होते. (JK statehood issue)

ते म्हणाले, ‘‘या मंचावर चार व्यक्ती आहेत ज्या कटरा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाला २०१४ मध्ये उपस्थित होत्या. तुम्ही नुकतीच निवडणूक जिंकली होती, पहिल्यांदाच पंतप्रधान झालात. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह त्यावेळी उपस्थित होते. आमचे उपराज्यपाल मनोज सिन्हा रेल्वे राज्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावत होते आणि मी येथे मुख्यमंत्री म्हणून होतो.’’ (JK statehood issue)

‘‘ माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने सिन्हा यांना पदोन्नती मिळाली आहे आणि माझी पदावनती झाली आहे. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि आता मी केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. तथापि, मला विश्वास आहे की ते दुरुस्त करण्यास जास्त वेळ लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरला पुन्हा तुमच्या देखरेखीखाली राज्याचा दर्जा मिळेल,’’ असे अब्दुल्ला म्हणाले.

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पूर्वीचे राज्य जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्गठित करण्यात आले.

ब्रिटीशांनाही शक्य झाले नाही…

श्री. अब्दुल्ला म्हणाले की, अनेक लोकांनी काश्मीरमध्ये रेल्वे सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. ब्रिटिशांनीही काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पाहिले होते पण ते यशस्वी झाले नाहीत. झेलम नदीच्या काठावर उरी येथून रेल्वे आणून देशाशी जोडण्याची त्यांची योजना होती. ब्रिटिश जे साध्य करू शकले नाहीत ते तुमच्या (मोदी) हातून घडले आणि काश्मीर देशाच्या इतर भागाशी जोडले गेले आहे.

वाजपेयींचे मानले आभार

काश्मीरला जाणारी रेल्वे ही राष्ट्रीय महत्त्वाची प्रकल्प म्हणून घोषित केल्याबद्दल श्री. अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (JK statehood issue)

‘‘माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे आभार न मानणे ही एक मोठी चूक असेल. हा प्रकल्प निःसंशयपणे १९८३-८४ मध्ये सुरू झाला होता, परंतु वाजपेयींनी तो राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून घोषित केल्यानंतर आणि अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतरच तो पूर्ण झाला,’’ असे ते म्हणाले.

हेही वाचा :
जगातील सर्वांत उंच पुलाचे उद्घाटन

रेपो दरात ५० पॉईंटची घसघशीत कपात

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर