कोल्हापूर : प्रतिनिधी : भावाच्या खुनासाठी सहा लाख रुपयांची सुपारी दिल्याची घटना जयसिंगपूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्वे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांनी या गुन्ह्यात भावासह सहा आरोपींना बेड्या ठोकला. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात हा खुनाचा उघडकीस आणला. (Jaysingpur Murder case)
मंगळवारी २७ मे रोजी सकाळी पावनेआठ वाजण्याच्या सुमारास बसवान खिंडीत असले डोंगरात तमदलगे गावचे हद्दीत गावठाण जमिन गट नं. २८ जाणारे रोडचे बाजूस अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीती घेण्यासाठी नेमण्यात आली. तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील दोन पोलीस पथके नेमण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मयताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याचेवर संशय आलेने त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक चौकशी केली असता त्याने सख्खा भाऊ अविनाशचा खून केल्याची कबुली दिली. अविनाश दारु पिवुन घरी भांडण करुन त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करत होता. त्यांच्या या कृत्याला कंटाळुन जिनगोंड पाटील याने त्याचा मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खुप त्रास देत असलेने त्याचा काटा काढणेचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मित्र मोहन पाटील याने त्याचे ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी, ता. शिरोळ) यास बोलावुन घेवुन अविनाश पाटील याला ठार मारणेचे आहे, असे सांगीतले. त्यावर राकेश थोरात याने अविनाशला मारणेसाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. यावर जिनगोंडा पाटील याने अविनाशला ठार मारायच्या आधी तीन लाख व मारलेनंतर तीन लाख रुपये देण्याचे कबुल केले. (Jaysingpur Murder case)
जिनगोंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश थोरात याला मोहन पाटील याचे मध्यस्थीने तीन लाख रुपये दिले. त्यानंतर राकेश थोरात याने अविनाशला ठार मारणेकरीता त्यांचे सहकारी मित्र किरण थोरात, सागर भिमराव लोहार, अमर रामदास वडर याना सोबत घेवुन अविनाश घरातुन किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर संशयितांनी संगनमत करुन२६ मे रोजी अविनाश याचेवर पाळत ठेवुन व योग्य संधी पाहुन रात्री तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत असलेल्या निर्जन डोंगरात नेले. तिथे दारुच्या नशेत असलेल्या अविनाशच्या डोक्यात दगड घालुन निघृण खून केलेची कबूली दिली.
पोलिसांनी निमशिरगाव, दानोळी व भादोले येथून संशयितांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हा अनुषंगाने तपास केला असता संशयितांनी अविनाशचा खुन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी जिनगोंडा ओमगोंडा पाटील ( वय ३७ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, गौंडाप्पा मळा, निमशिरगाव, ता. शिरोळ), मोहन प्रकाश पाटील (वय ३३ वर्ष, रा. सांगली बायपास रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, निमशिरगाव), राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (वय २३ वर्ष, रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी), किरण आमान्ना थोरात (वय २७ वर्ष, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी), सागर भिमराव लोहार (वय ३० वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले) अमर रामदास वडर (वय ३३ वर्ष, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले) यांना अटक केली. (Jaysingpur Murder case)
उप विभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कदम, पोलीस उप निरीक्षक प्रवीण माने, युनुस इनामदार शेष मोरे, जालिंदर जाधव, राजीव शिंदे जयसिंगपुर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजय गुरखे, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी, एलसीबीचे पोलीस अंमलदार नामदेव यादव, संजय कुंभार, महेश पाटील, नवनाथ कदम, दिपक घोरपडे, समीर कांबळे, गजानन गुरव, अमीत सर्जे, महेश खोत, विशाल चौगुले, सागर माने, प्रदीप पाटील, महेद्र कोरवी, राजेंद्र व्हरंडेकर, महादेव कुन्हाडे व सुशील पाटील यांचा तपासात सहभाग होता.