जत : यल्लमा देवी यात्रा २६ डिसेंबरपासून

जत : महाराष्ट्रासह व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लमादेवीची यात्रा २६ ते ३० डिसेंबर २०२४ ला भरणार आहे. श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या यल्लमादेवीची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरते. यावर्षीही यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील दि.२६ डिसेंबर रोजी यल्लमादेवीच्या गंधोटगीचा दिवस, दि.२७ रोजी महा नैवैध्याचा दिवस, दि.२८ रोजी नगर पालखी प्रदक्षिणा व किचाचा दिवस असे यात्रेचे प्रमुख तीन दिवस असून सोमवार दि.३० डिसेंबर २०२४ रोजी अमावस्या आहे.

यात्रेत दुकान, हॉटेल, खानावळ, करमणूकीची साधने यासाठी जागावाटप शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ व मंगळवार दि.१७ डिसेंबर २०२४ हे रोजी करण्यात येणार आहेत. यल्लमादेवी प्रतिष्ठान, जतचे श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे यांनी यात्रेकरिता नियोजन सुरू आहे.

यात्रेतील प्रमुख अकर्षण असलेल्या खिलार जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरविण्याच्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाल्याने भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात्रा ज्या जागेवर भरविण्यात येते त्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाल्याने भविष्यात यात्रा करणे अवघड जाणार आहे. आरक्षित असलेल्या जागेवरील संपूर्ण अतिक्रमणांची चौकशी करावी व या येत्या काळात अशा प्रकारे कोणतीही अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षाही भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी