महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे खंडित झाला. (Jasprit Bumrah)
प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सात फलंदाज गमावून ४०५ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखता आले नाही. मात्र, जसप्रीत बुमराह हा एकाकी झुंज देत १२व्यांदा डावात पाच विकेट्स घेतल्या.
आज (दि.१५) सकाळी ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावांपासून खेळायला सुरूवात केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सात फलंदाज गमावून ३७७ धावा केल्या. आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज बाद केले. यात त्याने उस्मान ख्वाजा (२१) आणि नॅथन मॅकस्विनी (९) यांना बाद करून दोन धक्के दिले. यानंतर पहिल्या सत्रातच नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला (१२) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट पडू दिली नाही. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली. (Jasprit Bumrah)
ही भागीदारी फोडण्याचे काम बुमराहने केले. त्याने स्मिथला रोहितकरवी झेलबाद केले. त्यानंतर हेडला विकेटकीपर पंतने झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक झळकावले आणि स्मिथने ३३वे शतक झळकावले. स्मिथ १९० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करून बाद झाला. तर, हेड १६० चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने १५२ धावा करून बाद झाला. यानंतर त्याने बुमराहने मार्शला (५) बाद केले. मार्शला बाद करत बुमराहने कसोटी कारकिर्दीतील ११वे पाच विकेट घेतल्या. त्याने कसोटीत २५ षटके टाकली असून ७२ धावांत पाच विकेट्स घेतल्या.
बुमराहने मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक १७ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत त्याने नवीन चेंडूसह, बुमराहने ७.०८ च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या. तर, जुन्या चेंडूवर पाच विकेट्स घेतल्या आहेत. (Jasprit Bumrah)
परदेशात भारतासाठी सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारे खेळाडू (सर्व फॉरमॅट)
- ११ : जसप्रीत बुमराह
- १० : कपिल देव
- ९ : अनिल कुंबळे
- ८ : इशांत शर्मा
- ८ : बी चंद्रशेखर
Two wickets in quick succession.@Jaspritbumrah93 picks up yet another 5-wicket haul 🔥🔥
Mitchell Marsh and Travis Head depart.#AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/UbTZesATz4
— BCCI (@BCCI) December 15, 2024
हेही वाचा :