Jadeja Vice-Captain : वेस्ट इंडिज कसोटीसाठी जडेजाची उपकर्णधारपदी निवड

Jadeja Vice-Captain

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन  कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे, करुण नायरला वगळण्यात आले आहे.  देवदत्त पडिक्कलला संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, तर दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १० ऑक्टोबरपासून सुरू होईल. (Jadeja Vice-Captain)

भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच घरच्या मैदानावरची मोहीम आहे.  त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली होती. २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील ही भारताची पहिली मालिका होती.

ऋषभ पंत अद्याप बरा झाला नसल्याने त्याची संघात निवड झालेली नाही.  इंग्लंड दौऱ्यात त्याने उपकर्णधार म्हणून काम पाहिले. त्याच्या जागी उपकर्णधार रवींद्र जडेजा यांची निवड केली आहे.  ध्रुव जुरेल आणि एन. जगदीसन हे दोन विशेषज्ञ यष्टीरक्षक आहेत, ज्यात जुरेल हा पहिल्या पसंतीचा पर्याय असण्याची शक्यता आहे.घरच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांची भूमिका मोठी असल्याने कुलदीप यादवसह रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना तीन फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले आहे. (Jadeja Vice-Captain)

नितीश कुमार रेड्डी हे वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असणार आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे पहिल्या पसंतीचे वेगवान गोलंदाज आहेत.

भारतीय संघातील खेळाडूंची नावे अशी : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, प्रवीण के. (Jadeja Vice-Captain)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

फिफा वर्ल्डकप मॅच दिवशी शाळा बंद