तेहरान : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘बिनशर्त आत्मसमर्पणा’चे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी फेटाळून लावले. इराण कधीही कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Iran warns US)
टेलिव्हिजनवरील भाषणात, खामेनी यांनी अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला.
ते म्हणाले, ‘‘कोणत्याही लष्करी हस्तक्षेपामुळे निःसंशयपणे कधीही भरून न येणारे नुकसान होईल याची जाणीव अमेरिकेला असायला पाहिजे.’’
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे. (Iran warns US)
हायपरसोनिक शस्त्रांच्या वापरासह इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या वृत्तांदरम्यान अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी इराणने आत्मसमर्पण करावे किंवा परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच अमेरिकेने निर्धार केल्यास खामेनींना ‘सहजपणे संपवू’ शकते, असे विधान केले होते.
इस्रायलला लष्करी मदत करू नका : अमेरिकेला रशियाचा इशारा
इस्रायलला इराणविरोधात लष्करी मदत करू नका. इस्रायलला अमेरिकेकडून होणारी थेट लष्करी मदत मध्य पूर्वेतील परिस्थिती कमालीची अस्थिर होईल, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी बुधवारी (१८ जून) हा इशारा दिला आहे. (Russia warns US)
रशियाच्या एसव्हीआर परराष्ट्र गुप्तचर सेवेचे प्रमुख आणि उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई नारिश्किन यांनी म्हटले आहे की इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती आता गंभीर आहे.(Iran warns US)
रशियाच्या इंटरफॅक्स वृत्तसंस्थेनुसार, रियाबकोव्ह यांनी अमेरिकेला इस्रायलला थेट लष्करी मदत देण्याविरुद्ध किंवा अशा ‘काल्पनिक पर्यायांचा विचार करू नये,’ असा इशारा दिला. (Iran warns US)
‘‘ अमेरिकेने असे पाऊल उचलल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि मध्य पूर्वेतील परिस्थिती कमालीची अस्थिर होईल,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
इराणमध्ये ५८५ नागरिकांचा मृत्यू
इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान ५८५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. १,३२६ जण जखमी झाले आहेत, असे एका मानवाधिकार गटाने म्हटले आहे.
विमानतळ सूत्रांनी आणि वेब फ्लाइट ट्रॅकिंग साइट्सनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायप्रसमधून इस्रायलसाठी विमाने रवाना झाली. ज्यामध्ये इराणशी झालेल्या संघर्षादरम्यान परदेशात अडकलेल्या इस्रायली नागरिकांना मायदेशी नेण्यात आले. इस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की सुमारे १,५०,००० इस्रायली परदेशात आहेत, त्यांपैकी सुमारे एक तृतीयांश मायदेशी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा :
ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेचा तपशील द्यावा : काँग्रेस
ट्रम्प यांच्याकडून आगीत तेल : चीन