डांबराची तपासणी करुन रस्ता करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : डांबराची तपासणी करुनच रस्ता करा, रात्रीच्यावेळी रस्ते तयार करताना कनिष्ठ अभियंताने हजर राहिलेच पाहिजे, असे आदेश महानगरपालिका प्रशासक कार्तिकेयन एस.यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिला. महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी मसुरीला ट्रेनिंगला गेल्या असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेय यांच्याकडे महानगरपालिका प्रशासक पदाचा कार्यभार आहे.

शहरात  सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून १६ रस्ते मंजूर आहेत. मंजूर रस्त्यापैकी १२ रस्त्यांची कामे सध्या ठेकेदारामार्फत सुरु आहेत. या कामाची आज गुरुवारी दुपारी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. लक्षतिर्थ वसाहत, बेलबाग परिसर, जरगनगर या ठिकाणी केली. यावेळी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी संबंधीत ठेकेदाराकडून सुरु करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. वाहतुकीमुळे ज्या ठिकाणी दिवसा रस्त्यांचे काम करणे शक्य नाही त्या ठिकाणी रात्री काम करण्याच्या सूचना दिल्या.  रस्त्यांची रात्रीची कामे करताना महापालिकेचा कनिष्ठ अभियंता व सल्लागार कपंनीला कामावर हजर राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कामाच्या कामाचा दर्जा चांगल्या ठेवावा. लक्षतिर्थ वसाहत येथे  डांबरी रस्ता करताना डांबराची तपासणी करुनच काम सुरु करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या.  हि पाहणी करताना रस्त्यांमध्ये काही ठिकाणी कच-याचे ढिग आढळून आले. त्यांनी मुख्य आरोग्य निरिक्षक यांना तातडीने सर्व ठिकाणचा कचरा उठाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, सागर शिंदे, ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स सत्तार मुल्ला, सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएटचे प्राजेक्ट मॅनेजर ए.व्ही.कसबेकर आदि उपस्थित होते.

 

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी