मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन

पुणेः

संमेलनास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, आमदार महेश दादा लांडगे, आमदार बाबाजी काळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इंद्रायणी साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता “ज्ञानेश्वरी – काळाची गरज” या परिषदेचे उद्घाटन डॉ. आरती दातार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (Indrayani Sahitya Sammelan)

या परिसंवादात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव, हभप ॲड. यशोधन महाराज साखरे, योगी निरंजनाथ गुरु शांतिनथ, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद सहभाग घेणार आहेत. दुपारी दोन वाजता संमेलनाध्यक्ष दादाभाऊ जयवंत गावडे यांची मुलाखत राजेंद्र घावटे घेणार आहेत. दुपारी तीन वाजता, डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत संदीप तापकीर घेतील. सायंकाळी पाच वाजता “दुर्ग भटकंती” या अरुण बोराडे यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. माधवराव सानप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सायंकाळी ७:३० वाजता, शिवांजली साहित्य परिषदेचे प्रवर्तक शिवाजीराव चाळक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, संतोष घुले, समन्वयक डॉ. पौर्णिमा कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Related posts

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…