पुणेः इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे संमेलनाध्यक्ष आहेत. तर स्वागत अध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे आणि निमंत्रण अरुण बोऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. (Indrayani Sahitya Sammelan)
संमेलनास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, आमदार महेश दादा लांडगे, आमदार बाबाजी काळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इंद्रायणी साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता “ज्ञानेश्वरी – काळाची गरज” या परिषदेचे उद्घाटन डॉ. आरती दातार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (Indrayani Sahitya Sammelan)
या परिसंवादात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव, हभप ॲड. यशोधन महाराज साखरे, योगी निरंजनाथ गुरु शांतिनथ, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद सहभाग घेणार आहेत. दुपारी दोन वाजता संमेलनाध्यक्ष दादाभाऊ जयवंत गावडे यांची मुलाखत राजेंद्र घावटे घेणार आहेत. दुपारी तीन वाजता, डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत संदीप तापकीर घेतील. सायंकाळी पाच वाजता “दुर्ग भटकंती” या अरुण बोराडे यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. माधवराव सानप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता, शिवांजली साहित्य परिषदेचे प्रवर्तक शिवाजीराव चाळक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, संतोष घुले, समन्वयक डॉ. पौर्णिमा कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा उद्या ‘किक ऑफ’
- दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई
- ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू