Indians lost : भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान संपुष्टात

Indians lost

बँकॉक : थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गुरुवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी निराशाजनक ठरला. महिला व पुरुष एकेरीमध्ये, तसेच महिला दुहेरीमध्ये दुसऱ्या फेरीत भारतीय बॅडमिंटनपटूंना पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या एकाही बॅडमिंटनपटूला तिसऱ्या फेरीत प्रवेश करता न आल्याचे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. (Indians lost)

महिला एकेरीत उन्नती हुडा, मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप या भारतीय बॅडमिंटनपटूंना दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. थायलंडच्या अग्रमानांकित पोर्नपावी चोचुवाँगने उन्नतीला ३९ मिनिटांमध्ये २१-१४, २१-११ असे नमवले. थायलंडच्याच सातव्या मानांकित रॅचनॉक इंतानॉनने मालविकावर ४४ मिनिटांत २१-१२, २१-१६ अशी मात केली. थायलंडच्या चतुर्थ मानांकित सुपानिदा केटथाँगने आकर्षीचा ३४ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-९, २१-१४ असा पराभव केला. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या केवळ तरुण मानेपल्लीला दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित आंद्रेस अँटनसनचे आव्हान त्याला पेलता आले नाही. अँटनसनने ४२ मिनिटांत तरुणला २१-१४, २१-१६ असे हरवले. (Indians lost)

महिला दुहेरीमध्ये ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या भारतीय जोडीला तृतीय मानांकन होते. मात्र दुसऱ्या फेरीत जपानच्या रुई हिरोकामी-सायाका होबारा या जोडीने ट्रिसा-गायत्री जोडीला २२-२०, २१-१४ असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत ५३ मिनिटे रंगली. पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्यांदरम्यान प्रत्येक गुणासाठी चुरस होती. हा गेम २२-२० असा जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर जपानच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये भारतीय प्रतिस्पर्ध्यांना फारशी प्रतिकाराची संधी दिली नाही. हा गेम २१-१४ असा जिंकून रुई-साबाका यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. (Indians lost)

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार