लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाने गावात मोठा पोलिस फौजफाटा लावून ही प्रक्रिया रद्द करण्यास गावकऱ्यांना भाग पाडले. यानंतर आज (दि.८) शरद पवार यांनी मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी ते ईव्हीएम हटाव, देश बचाव या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पाश्चिमात्य देशांमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जात असतील तर भारतातही बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली (Sharad Pawar News)

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मारकडवाडीतील नागरिकांना बॅलेट पेपरवर मतदान करायचे आहे. अशी भूमिका घेतल्यावर त्यांच्यालवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही माझ्याकडे ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी ईव्हीएमवर निवडणूक नको, ती मतपत्रिकेवर व्हावी, असा ठराव देखील एकमताने करण्यात आला.

शरद पवार म्हणाले की, “निवडणुका होत असतात. यात काही लोकांचा विजय होतो. तर, काहींना पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका का नाही? : शरद पवार

जगात अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. जर संपूर्ण जगभरात निवडणुका बॅलेट पेपरवर होत आहेत. तर आपल्या अशा पद्घतीने निवडणुका का होत नाहीत? असा शरद पवार यांनी उपस्थित केला. (Sharad Pawar News)

तर का घाबरता : जितेंद्र आव्हाड

मारकवाडी येथे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा कार्यक्रम मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तर, तुम्ही त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्यास का रोखत आहात. त्यांना जर बॅलेट पेपरवर मतदान करायचे असल्यास त्यांना करू द्या. त्यात हस्तक्षेप करून त्यांच्यार गुन्हे नोंद करण्याची काय गरज आहे. तुम्ही यांना घाबरलात का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला.

 

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली