सावरकरांचे ब्रिटिशांकडे दहा वेळा दयेचे अर्ज

Court rejects Ghandhi’s Plea

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली. त्यांनी न्यायालयात कबूल केले की, सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे शिक्षेत सवलत मिळावी म्हणून दहा वेळा दयेचे (clemency/mercy) अर्ज केले होते. (Savarkar’s ten mercy petitions)

राहुल गांधी यांच्या वकिलांनी सावरकरांच्या दयेच्या अर्जांचा आणि इतर क्रांतिकारकांच्या भूमिकेचा संदर्भ देत अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी सावरकर यांनी अनेक ऐतिहासिक तथ्ये मान्य केली.

विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी केली. त्यावेळी अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. (Savarkar’s ten mercy petitions)

 “सावरकरांनी दहा वेळा दयेचे अर्ज दाखल केले होते, हे खरे आहे,” असे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले.

पहिल्याच महिन्यात दयेचा अर्ज

उलटतपासणीदरम्यान त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब मान्य केली. त्यांनी सांगितले की, त्याच काळातील प्रसिद्ध क्रांतिकारक राजगुरू, बटुकेश्वर दत्त आणि अशफाकउल्ला खान यांनी ब्रिटिश सरकारकडे कोणताही दयेचा अर्ज केलेला नव्हता. सावरकरांनी शिक्षा सुनावल्यानंतर पहिल्याच महिन्यात दयेचा अर्ज दाखल केला होता, हेही त्यांनी साक्षीमध्ये सांगितले. (Savarkar’s ten mercy petitions)

सात्यकी सावरकर यांनी सावरकरांच्या कृतीचे समर्थनही केले. ते म्हणाले, ब्रिटिश काळात कैद्यांकडून अशा प्रकारचे अर्ज करणे ही एक सर्वसाधारण प्रशासकीय प्रक्रिया होती. या अर्जांचा अर्थ ब्रिटिश सरकारप्रती निष्ठा व्यक्त करणे असा नव्हता. हे अर्ज केवळ शिक्षेत सवलत मिळवण्यासाठी किंवा कारावासाच्या अटींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी केले जात असत.

सुनावणीदरम्यान भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्याबाबतही चर्चा झाली. त्यावर सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, त्यांना याची माहिती नव्हती की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिश सरकारकडे स्वतःला युद्धकैदी म्हणून वागणूक देण्याची मागणी केली होती, आणि कोणत्याही प्रकारची दयामाफी किंवा सवलत नाकारली होती. (Savarkar’s ten mercy petitions)

मात्र, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आपल्या विचारसरणीशी आणि तत्त्वांशी शेवटपर्यंत तडजोड केली नाही. ब्रिटिश सत्तेविरोधातील त्यांची भूमिका अखेरपर्यंत कायम राहिली, हेही त्यांनी मान्य केले.

वीर उपाधी अंदमानपूर्वीची

सावरकरांना ‘वीर’ ही उपाधी अंदमानच्या तुरुंगात जाण्यापूर्वीच मिळाली होती. गदर चळवळीशी संबंधित एका नियतकालिकाने त्यांना ही उपाधी दिली होती, असे त्यांनी नमूद केले. (Savarkar’s ten mercy petitions)

राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये लंडन येथे केलेल्या एका भाषणावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे. त्या भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल काही विधाने केली होती. त्या विधानांमुळे सावरकरांची बदनामी झाल्याचा आरोप करत सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या सुनावणीमुळे सावरकरांच्या दयेच्या अर्जांबाबतचा ऐतिहासिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला टीकाकारांचा दावा आहे की, हे अर्ज ब्रिटिशांशी तडजोड दर्शवतात, तर समर्थकांचे म्हणणे आहे की ते तुरुंगातून बाहेर पडून पुढील राजकीय कार्य सुरू ठेवण्यासाठी केलेले धोरणात्मक प्रयत्न होते. (Savarkar’s ten mercy petitions)

मात्र या सुनावणीत न्यायालयीन नोंदीवर आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दयेचे अर्ज केले होते, ही वस्तुस्थिती त्यांच्या स्वतःच्या नातलगाने न्यायालयात मान्य केली.

Related posts

अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा राजू शेट्टीचा इशारा   

राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह

चंद्रचूडांच्या काठीने एकनाथ शिंदेंकडून लोकशाही वेठीला