हसन मुश्रीफ सहाव्यांदा आमदार

कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे, तर जिल्ह्यात डबल हॅटट्रिक करणारे पहिले आमदार ठरले आहेत. समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यावर त्यांनी ११ हजार ६३२ मतांनी हा विजय संपादन केला आहे. मुश्रीफ यांना एक लाख ४५ हजार २५७ मते मिळाली, तर समरजितसिंह घाटगे यांना एक लाख ३३ हजार ६२५ मते मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी होऊन विजयाचा षटकार मारणार, की समरजितसिंह घाटगे हे त्यांची विकेट घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दोघांमधील लढत काट्याची टक्कर अशीच होती.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी