Hanif Abbasi : पाकचे १३० अणुबॉम्ब भारतासाठीच

Hanif Abbasi

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना सिंधू पाणी करार रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाककडे असलेले १३० अणुबॉम्ब हे भारतासाठी आहेत अशी दर्पोक्ती त्यांनी केली आहे. (Hanif Abbasi)

हनीफ अब्बासी म्हणाले, पाकची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने आहेत. भारताने कोणतीही कारवाई केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तीशाली अणुबॉम्ब् आहेत. आम्ही घौरी, शाहीन, गझनवी सारखी क्षेपणास्त्रे आणि १३० अणुबॉम्ब भारतासाठी ठेवले आहेत. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करण्याची पूर्ण तयारी केली आहे. (Hanif Abbasi)

सिंधू पाणी करार रद्द करणे हे युद्धाचे निमित्त ठरू शकते. भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. पाकिस्तान कोणत्याही कारवाईला योग्य उत्तर देण्यास तयार आहे असेही हनीफ अब्बासी यांनी म्हटले आहे. (Hanif Abbasi)

जम्मू काश्मिरमध्ये पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने तातडीने हलचार करत सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेने पाकिस्तानात खळबळ उडाली असून त्याचे परिणाम पाकच्या शेअर बाजारावरही पडले आहेत. (Hanif Abbasi)

हेही वाचा :

लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

ऑनर किलिंग, बापाने घातल्या मुलीला गोळ्या

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना