‘गुजरात’चा ‘दिल्ली’वर एक धावेने थरारक विजय: मिलरची चूक दिल्लीला भोवली

Gujarat secures a thrilling one-run victory over Delhi

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ क्रिकेट स्पर्धेला रंग भरू लागला असून गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर एक धावेने नाट्यमय विजय मिळवला. दोन चेंडूत दोन धावांची गरज दिल्लीला असताना मिलरने पाचव्या चेंडूस धाव घेण्यास दिलेला नकार आणि शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाल्याने दिल्लीच्या पराभवाची चूटचूट क्रिकेट शौकिनांच्या मनाला लागून गेली. (Gujarat secures a thrilling one-run victory over Delhi)

दिल्लीला विजयासाठी २१० धावांची गरज होती. शेवटच्या २० व्या षटकातातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन धावांची गरज होती. दिल्लीचा हुकमी फलंदाज मिलर फलंदाजी करत होता. प्रसिद्ध कृष्णाच्या पाचव्या चेंडूवर त्याला एक धाव मिळाली असती. पण त्याने नकार दिल्याने कुलदीप यादवला क्रीझमध्ये परवावे लागले. या चेंडूवर धाव घेतली असती तर सामना बरोबरीत आला असता. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. पण प्रसिद्ध कृष्णाने स्लोअर बाऊन्सर टाकल्याने मिलर फटका मारण्यास हुकल्याने चेंडू यष्टिरक्षक बटलरकडे गेला. त्याने चपळाईने थ्रो मारल्याने कुलदीप यादव बाद झाला आणि गुजरात टायटन्सने थरारक विजयाची नोंद केली. (Gujarat secures a thrilling one-run victory over Delhi)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकात ४ बाद २१० धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलेने ४५ चेंडूत ७० धावा चोपल्या. त्याने चार चौकार आणि पाच षटकार ठोकले. जॉस बटलरने तीन चौकार पाच षटकार ठोकत २७ चेडूत अर्धशतक झळकावत ५२ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ३२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. (Gujarat secures a thrilling one-run victory over Delhi)

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी धडाकेबाज खेळी केली. पथुम निसांकाने ४१ तर केएल राहूलने ५२ चेंडूत ९२ धावा केल्या. त्याने ११ चेंडू सीमापार केले तर चार षटकार खेचले. मोहम्मद सिराजच्या वाईड यॉर्करला तो चकला आणि बटलरकडे झेल देऊन तंबूत परतला. मनगटाला दुखापतीतून मैदानाबाहेर गेलेला डेव्हिड मिलर परत मैदानात आला. त्याने मोहम्मद सिराजची गोलंदाजी फोडून काढत वीस धावा कुटल्या. शेवटच्या दोन चेंडूत मात्र मिलरला चेंडू फटकावता न आल्याने गुजरातने एक धावेने थरारक विजयाची नोंद केली. मिलरने प्रत्येकी तीन चौकार, षटकार मारत २० चेंडूत ४१ धावा चोपल्या. रशिद खानने तीन गडी बाद केले. निर्णायक षटक टाकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले. (Gujarat secures a thrilling one-run victory over Delhi)

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक