Good Bad Ugly: ‘गुड बॅड अग्ली’ची दमदार कमाई

Good Bad Ugly

Good Bad Ugly

मुंबई : अधिक रविचंद्रनची निर्मिती आणि अजित कुमार स्टारर चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. तिकीट खिडकीवर दिवसेंदिवस दमदार कमाई करत आहे. तमिळमधील या ॲक्शन कॉमेडीपटाने जगभरात शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. (Good Bad Ugly)

भारतातही तो दमदार कमाई करत आहे. आठवड्यात या सिनेमाने ८४.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे साहजिकच हा चित्रपट भारतातही लवकरच शंभर कोटींवर कमाई करेल, असा विश्वास त्याचे निर्माते व्यक्त करत आहेत. (Good Bad Ugly)

अधिक रविचंद्रन यांचा नवा कोरा चित्रपट ‘गुड बॅड अग्ली,’ १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सॅकनिल्कच्या मते, अजित कुमार आणि त्रिशा कृष्णन अभिनीत या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी भारतात ८४.५० कोटी रुपयांची कमाई केली.

ट्रेड वेबसाइटच्या वृत्तानुसार, या सिनेमाने पहिल्या रविवारी भारतात अंदाजे २०.५० कोटी रुपये कमाई केली. त्यामुळे पहिल्या आठवड्याच्या शेवटी एकूण ८४.५० कोटी रुपये कमाई झाली. चित्रपटाने भारतात २९.२५ कोटी रुपयांचा निव्वळ कमाई केली. शुक्रवारी ४८.७२% घटून  बॉक्स ऑफिसवर त्याने १५ कोटी रुपये कमावले. (Good Bad Ugly)

परंतु शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शुक्रवारची कसर भरून काढत ३१.६७% वाढ नोंदवली. या दिवशी १९.७५ कोटी रुपयांचा आकडा गाठला. लागोपाठ रविवारीही तितकीच चांगली कामगिरी केली. शनिवारी, ‘गुड बॅड अग्ली’ने जागतिक स्तरावर १०० कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला. जगभरात ११४.५० कोटी रुपये कमावले.

सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट

‘गुड बॅड अग्ली’ हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट ठरला आहे. अलीकडेच त्याने ‘माधा गधा राजा’ आणि ‘वीरा धीरा सूरन’ ने घवघवीत यश मिळवले. या सिनेमांना मागे टाकत तो वरचढ ठरला.

गुड बॅड अग्लीमध्ये अजित एके उर्फ ​​रेड ड्रॅगन नावाच्या गुंडाची भूमिका साकारत आहे. तो ते जीवन सोडून देण्याचा निर्णय घेतो, मात्र त्याच्या मुलाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाईलाजाने त्याला मूळ भूमिकेत जावे लागते.  

हेही वाचा :
सत्य का नाकारताय?
हिंदीत अस्सल निर्मितीच नसते..

Related posts

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Kiran Rijiju

Kiran Rijiju: ‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय

Bumrah, Mandhana

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान