अलीगढ : गोमांस वाहतुकीच्या संशयावरून कथित हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित लोकांनी चौघा मुस्लिम युवकांना बेदम मारहाण केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नमुने घेतले. ते तपासासाठी पाठवण्यात आले. मात्र आलेल्या अहवालानुसार ते गोमांस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (four-muslims beaten)
अलीगढ (ग्रामीण)चे पोलीस अधीक्षक अमृत जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘तपासासाठी पाठवण्यात आलेल्या मांसाचा अहवाल आला आहे. ते गोमांस नाही, असे त्यात म्हटले आहे.’’ ‘द क्विंट’ हिंदीने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांवर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ मे रोजी ही घटना घटना घडली होती. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. कथित हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्यावर गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हरदुआगंज पोलिसांत केलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (four-muslims beaten)
मारहाणीत जखमी अकीलचे वडील सलीम खान यांनी २० ते २५ जणांविरोधात मारहाण आणि ५० हजार रुपये खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत विजय कुमार गुप्ता, विजय बजरंगी, लवकुश याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे.
‘‘खंडणी मागत मारहाण केली’’
सलीम खान (रा. अतरौली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘मुलगा अकील, भाजा अरबाज त्यांच्या दोघा साथीदारांसह २४ मे रोजी सकाळी अल अंबर मीट फॅक्टरीतून मटण घेऊन अतरौलीकडे येत होते. त्यावेळी त्यांची गाडी रामकुमार आर्य, अर्जुनसह आणखी २०-२५ अज्ञातांनी अडवली. त्यांनी त्यांच्याकडे ५० हजाराची खंडणी मागितली. पैसे द्यायला नकार दिल्यानंतर या सर्वांनी लाकडी दांडक्यांनी आणि धारदार हत्यारांनी चौघांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील पैसे आणि मोबाईल चोरून नेला.’’
सर्व संशयितांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अमृत जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला माहिती मिळताच आमचे एक पथक घटनास्थळी पाठवले होते. ज्यांनी गाडी पकडली होती त्यांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते. मटण वाहतूक करणाऱ्यांसोबत योग्य कागदपत्रे होती. त्यामुळे त्यांना चौकशी करून सोडण्यात देण्यात आले होते.’’
हेही वाचा :
मणिपूरमध्ये ४४ आमदार सत्तास्थापनेस तयार
खोट्या एन्काउंटरची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय