नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ जण अत्त्यवस्था असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर ९०, प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. उरण कारंजजवळील समुद्राच्या परिसरात बुधवारी (दि.१८) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नौदल पोलीस तटरक्षक, मच्छीमारांनी संयुक्त बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढले. बचाव कार्यात नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. प्रवाशांना नेव्हीसह मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Ferry Boat Accident)

‘नीलकमल’ बोटीमध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेने नीलकमल बोटीला मोठी भेग पडली. यामुळे ही दुर्घटना घडली आहे असा दावा बोटचे मालक राजेंद्र पडसे यांनी केला आहे.

नौदलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेट वे ऑफ इंडिया कडून एलिफंटाकडे जात असलेल्या नीलकमल बोटीची प्रवासी क्षमता ८६ जणांची असून त्यामध्ये ५ कर्मचाऱ्यासह एकुण ११० जण होते. नेहमीप्रमाणे ती प्रवाशांना घेऊन निघाली होती. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उरण कारंज जवळ ग्रस्त घालणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट ने नीलकमल बोटीला वळसा घातला. पुन्हा ती नागमोडी वळण घेत वेगाने नीलकमलच्या दिशेने येऊन त्याला धडक दिली. (Ferry Boat Accident)

यावेळी नौदलाच्या स्पीड बोटचा प्रचंड वेग असल्याने जवानाला त्याला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. धडकेमुळे बोट पाण्यात बुडू लागली. त्यामुळे प्रवाशांच्यात एकच खळबळ उडाली. सर्वांनी लाईफ जॅकेट घातले असले. तरी भीतीमुळे त्यांची गाळण उडाली. आरडाओरड करीत त्यांनी मदतीसाठी अन्य बोटिंग चे लक्ष वेधले. ते पाहून किमार बोटीने त्याकडे बोट वळवली. या दुर्घटनेबाबत नौदल आणि तटरक्षका दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवले.
त्यानंतर घटनास्थळी नौदल,कोस्टल गार्ड व पोलीस दलाकडून पथके रवाना झाली. युद्ध स्तरावर बचाव कार्य सुरू करण्यात आले. घटनेचे गांभीर्य समजून हेलिकॉप्टर ही घटनास्थळी पाठवण्यात आले. यावेळी तातडीने बोटीतील प्रवाशांना बाहेर काढत अन्य बोट व हेलिकॉप्टर मधून समुद्रकिनाऱ्यावर आणले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले होते.

सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार करत असताना तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेची माहिती काही क्षणातच सर्वत्र पसरली. त्यामुळे अपघाताबद्दल उलट-सुलट अंदाज व्यक्त करण्यात येऊ लागले. नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पडसे यांना एका प्रवाशाने नौदलाच्या स्पीड बोटने धडक देत असलेल्या व्हिडिओ पाठवला. त्यांनी तो पत्रकारांना दाखवत या दुर्घटनेला नौदलाची स्पीड बोटच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. शेकापक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी अन्य बोटीतून जाऊन पाहणी केली.
दरम्यान , नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ही या घटनेचे प्रतिक्रिया उमटल्या. विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी माहिती देण्याची मागणी केली. त्यानुसार फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती देऊन सात ते आठ प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. (Ferry Boat Accident)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ