Father kills daughter : कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाकडून पोटच्या मुलीची हत्या

Father kills daughter

सांगली : प्रतिनिधी : नीट परिक्षेसाठी घेतलेल्या सराव परीक्षेत कमी गुण पडल्याच्या रागातून मुख्याध्यापकाने पोटच्या मुलीला जात्याच्या खुंटाने केलेल्या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक धोंडीराम भोसलेला अटक केली. (Father kills daughter)

पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. मुख्याध्यापक धोडींराम भोसले यांची कन्या साधनाला दहावीत ९३ टक्के गुण पडले आहेत. ती नीट परीक्षा देण्यासाठी अभ्यास करत होती. नीट परीक्षेच्या सराव परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्याबद्दल वडिलांनी साधना कमी गुणाबद्दल विचारणा केली. तुला डॉक्टर करण्याची आमची इच्छा असताना तू अभ्यास करत नसल्याने सराव परीक्षेत कमी मार्क पडल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी मुलगी साधना वडिलांना म्हणाली, ‘तुम्हालाही जास्त गुण पडले असते तर तुम्ही कलेक्टर झाला असता. कमी मार्क मिळाल्याने तुम्ही शिक्षक झाला,’ साधनाने दिलेल्या या प्रत्युत्तराने संतप्त झालेल्या वडिलांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने तिला बेदम मारहाण केली. तिच्या पोटात आणि पाठीवरही जोरात लाथा घातल्या. मारहाणीतून सुटका करण्यासासाठी साधनाच्या आईने प्रयत्न केला. त्यानंतर ती झोपण्याच्या खोलीत गेली. (Father kills daughter)

शनिवारी सकाळी योग दिन असल्याने सकाळी लवकर मुख्याध्यापक भोसले शाळेत गेले. शाळेतून घरी आल्यावर झोपलेली साधना बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. तिला उपचारासाठी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर वडील आणि घरच्यांनी साधना बाथरुममध्ये पडल्याचे सांगितले. पण तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालात बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी आईवडिलांकडे कसून चौकशी केला असता वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. साधनाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी धोंडीराम भोसले याला मुलीचा खून केल्याप्रकरणी अटक केली.  (Father kills daughter)

हेही वाचा :
नातवाने आजीला कचऱ्यात टाकले

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप