शेतकरी आंदोलन; रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील महामार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर यंत्रणांना निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेवर सुनावणी केली. (Farmers Protest)

पंजाबमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे. शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि दिल्लीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स आणि खिळे मारण्यात आले आहेत. ते हटवण्यात यावेत, अश् मागणी याचिकेत केली आहे. मात्र ती फेटाळण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी याआधी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर या मोर्चाला सुरक्षा दलांनी रोखले होते. (Farmers Protest)

शेतकरी आणि त्यांच्या शेतकरी संघटनांनी एक वर्षाहून अधिक काळ पंजाबच्या एंट्री पॉईंटवर राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. म्हणजे शंभू आणि अलीकडेच २४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपूर्ण पंजाब राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग विविध ठिकाणी रोखले होते.

देशाच्या उत्तरेकडील सीमेच्या दिशेने होणाऱ्या लष्कराच्या संपूर्ण हालचाली पंजाबमधून होतात. त्यामुळे महामार्ग रोखणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचा असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिवाय पंजाब आणि शेजारच्या राज्यांतील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचताही येत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

पुन्हा मोर्चा

आता आंदोलक शेतकऱ्यांनी ६ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. सहा डिसेंबर रोजी दिल्लीकडे कूच करण्याची योजना शेतकऱ्यांनी आखली होती. परंतु पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केल्यानंतर त्या दिवशीचा मोर्चा स्थगित करण्यात आला.  पुन्हा ‘दिल्ली चलो’ मोर्चा रविवार, ८ डिसेंबर रोजी सुरू झाला. मात्र यावेळीही पोलिसांनी अश्रूधुरांची नळकांडी शेतकऱ्यांच्या दिशेने फोडली. त्यामुळे मोर्चा पुन्हा थांबवण्यात आला.

 

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले