शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु. अंबालाजवळ पोहोचताच हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलक शेतकरी आक्रमक झाल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळांड्या फोडल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले. यानंतर किसान मजदूर मोर्चा आणि सुंयुक्त किसान मोर्चा यांनी आंदोलन स्थगित केले. (Delhi Chalo)

आज दिल्लीच्या दिशेने कूच केले. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी पायी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंबाला येथे पोहोचताच हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलक शेतकरी आक्रमक झाले. यानंतर त्यांनी दोन बॅरिकेट तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यात अनेक शेतकरी जखमी झाले. त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतरकिसान मजदूर मोर्चा आणि सुंयुक्त किसान मोर्चा यांनी आंदोलन स्थगित केले. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज सायंकाळी घेणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलक आता कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुमचे शिष्टमंडळ पाठवा. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असे हरियाणा सरकारने म्हटले आहे. परंतु, शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यावर ठाम आहेत. सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. याधी आंदोलक शेतकऱ्यांनी १३ आणि २१ फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी येथे सुरक्षा दलांनी रोखले होते. (Delhi Chalo)

शेतकरी नेते सुरजित सिंग फूल, बलजिंदर सिंग चडियाला, सतनाम सिंग पन्नू, सविंदर सिंग चौटाला आणि मनजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली १०१ शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. यानंतर अंबाला येथे पोहोचल्यानंतर आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु, काँक्रीट ब्लॉक्स, लोखंडी खिळे आणि तारांचा अडथळा आल्यामुळे शेतकऱ्यांना पुढे जाता आले नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या.

अंबालामधील इंटरनेट सेवा बंद

अंबालामध्ये ९ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर, अंबाला प्रशासनाने पाच अथवा त्याहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. यामुळे अंबाला परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या आहेत शेतकरी आंदोलकांच्या मागण्या

  • शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करावा
  • शेतकरी आणि शेतमजुरांची कर्जमाफी करावी
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावा
  • मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा
  • भूमीअधिग्रहन कायदा २०१३ पुन्हा एकदा लागू करण्यात यावा
  • लखीमपूरखेरीतल्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी
  • संविधानाची ५वी अनुसूची लागू करून आदिवासींच्या जमिनींची लूट थांबवण्यात यावी
  • वीज विधेयक २००० रद्द करण्यात यावे
  • मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं
  • खोटे बियाणं, कीटकनाशक, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले