न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १३६ धावा करून ही आघाडी ३४० धावांपर्यंत वाढवली. (England Test)

या कसोटीमध्ये पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पहिल्या डावामध्ये ९ बाद ३१५ धावा केल्या होत्या. रविवारी, न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने संघाच्या धावसंख्येत ३२ धावांची भर घातली. शनिवारी नाबाद राहिलेला अर्धशतकवीर सँटनरने १० चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. पॉट्सने सँटनरला बाद करून न्यूझीलंडचा डाव संपवला. त्यानंतर, फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या संपूर्ण संघाला उणीपुरी ३६ षटकेही खेळपट्टीवर तग धरता आला नाही. मॅट हेन्री, विल ऑरुर्के आणि सँटनर यांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली. इंग्लंडतर्फे जो रूटने सर्वाधिक ३२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्रीने चार, तर ऑरुर्के व सँटनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. (England Test)

दिवसाच्या अखेरच्या सत्रात पुन्हा फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेरपर्यंत दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १३६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात विल यंग आणि केन विल्यमसन यांनी अर्धशतके झळकावली. यंग ८५ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ६० धावा करून बाद झाला, तर विल्यमसन खेळ थांबला तेव्हा ५८ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ५० धावांवर खेळत होता. (England Test) त्याचा जोडीदार रचिन रवींद्र २ धावांवर खेळत होता.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत