Dragon spacecraft: ‘ड्रॅगन’ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

Dragon spacecraft

फ्लोरीडा : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या अन्य तीन अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन अंतराळयान गुरुवारी (२६ जून) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकार सुरक्षित दाखल झाले. (Dragon spacecraft)

भारतीय वेळेनुसार दुपारी ४:०१ वाजता उत्तर अटलांटिक महासागरावरून अंतराळ स्थानक जात असताना ड्रॅगन अंतराळयानाचे सॉफ्ट कॅप्चर झाले. नासाच्या लाईव्ह व्हिडिओ लिंकमध्ये अंतराळयान अंतराळ स्थानकाजवळ येत असल्याचे दाखवण्यात आले आणि डॉकिंग क्रम ४:१५ वाजता पूर्ण झाला.

ड्रॅगन अंतराळयानाच्या डॉकिंगसह भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले असून, त्यांनी इतिहास रचला आहे. (Dragon spacecraft)

ही मोहीम अनेकदा लांबवणीवर टाकण्यात आली होती. शेवटी बुधवारी (२५ जून) अनेक विलंबांनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह इतरांना घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन (अ‍ॅक्स-४) नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित करण्यात आले. आता काही दिवस त्यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मुक्काम असेल.

अ‍ॅक्स-४ मोहिमेत पायलट आणि ग्रुप कॅप्टन शुक्ला, अमेरिकेचे कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे मिशन स्पेशालिस्ट स्लावोस उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू यांचा समावेश आहे. फाल्कन ९ रॉकेटवरून ते बुधवारी प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर स्पेसएक्स ड्रॅगनने अंतराळयानातून आयएसएसकडे २८ तासांचा प्रवास सुरू केला.

दरम्यान, उड्डाणाच्या आदल्या दिवशी अंतराळवीर शुभांशू शुक्ला म्हणाले की एखादे मूल जशा नवीन गोष्टी शिकते तद्वतच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत कसे राहायचे याचे धडे मी घेत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचण्याच्या प्रवासात ड्रॅगन अंतराळयान पृथ्वीभोवती फिरत असताना व्हॅक्यूममध्ये तरंगण्याचा हा एक अद्भुत अनुभव होता. (Dragon spacecraft)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचण्यापूर्वी, अंतराळवीर शुक्ला यांनी ड्रॅगन अंतराळयानातून ‘अंतराळातून नमस्कार’केला. अंतराळयानातून व्हिडिओ लिंकद्वारे आपला अनुभव शेअर करताना, बुधवारी (२५ जून) अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेच्या प्रक्षेपणापूर्वी ३० दिवस क्वारंटाइनमध्ये राहिलो. माझ्या मनात फक्त एकच विचार होता तो म्हणजे हे काम आपण नक्की करू शकू, असे ते म्हणाले.

हेही वाचा :
सीबीएसई बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा

Related posts

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव

दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत