Raj declares Morcha: हिंदीसक्तीविरोधात ६ जुलैला मोर्चा : राज ठाकरे

Raj declares Morcha

मुंबई : हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरूवातीपासूनच थेट भूमिका घेतली आहे. हिंदी सक्ती केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही मनसेने दिला होता. तरीही राज्य शासनाने या प्रश्नावर बोटचेपी धोरण स्वीकारत हिंदीची सक्ती आडमार्गाने लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरोधात आता रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (२६ जून) जाहीर केली. (Raj declares Morcha)

त्यानुसार येत्या ६ जुलैला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी ठाकरे यांच्यासमोर सरकारची भूमिका मांडली. मात्र सरकारची भूमिका पूर्णपणे फेटाळली असल्याचे ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

६ जुलै रोजी या प्रश्नावर आपण मुंबईत मोर्चा काढणार असून गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल असेही त्यांनी जाहीर केले. (Raj declares Morcha)

 “शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ती आम्हाला मान्य नसल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशा प्रकारची कुठलीही सक्ती केलेली नाही, असे मंत्र्यांनीच मान्य केले. ही बाब राज्यावर सोपवण्यात आली असल्याचे तेच सांगताहेत. असे असताना हिंदीची सक्ती का करत आहेत? हे अनाकलनीय आहे, असे राज यावेळी म्हणाले.

सीबीएससी शाळा आयएएस अधिकार्‍यांच्या मुलांसाठी काढण्यात आल्या होत्या. आता त्या शाळांचे वर्चस्व राज्यांच्या शाळांवर लादण्याचा प्रयत्न आहे. केंद्रातला आणि आयएएस अधिकाऱ्यांचा तो अजेंडा आहे. महाराष्ट्र हे स्वत:वर का लादून घेतोय, अशी विचारणा मी मंत्री भुसे यांच्याकडे केली मात्र ते त्याच-त्याच गोष्टी बोलत होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj declares Morcha)

मोर्चात कुणाचाही झेंडा नसेल..

“हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही म्हणजे नाही. म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय, येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल, त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल,” अशी घोषणाही ठाकरे यांनी यावेळी केली. (Raj declares Morcha)

ते म्हणाले, “मोर्चाच्या अनुषंगाने शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक आणि इतर सर्वांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व पालक, सर्व विद्यार्थ्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. इतर राजकीय पक्षांशीही चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारला एकदा महाराष्ट्राच्या मनात नेमके काय आहे ते कळू दे. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल.”

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या