विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे माझी कमजोरी समजू नका, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

सेनापती कापशी (ता.कागल) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी घाटगे पुढे‌ म्हणाले, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ४० हजार स्वाभिमानी जनतेने शेअर्सपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. पण ते कारखान्याच्या रेकॉर्डवर कुठेच सभासद म्हणून नोंद नाहीत. हे सभासद रेकॉर्डवर नसताना त्यांना दिलेल्या साखरेची नोंद कारखान्यात होवू शकते का ? नाही. मग ही रेकॉर्डवर नसलेली साखर कोठून आली? या प्रश्नावर सभेतूनच उत्तर आले काटामारीतून. मुश्रीफांनी विकासकामात मलिदा मारला. तोच मलिदा त्यांनी कारखान्यातही मारला आहे.

पालकमंत्र्यांनी शरद पवारांसोबतची निष्ठा विकली. कशासाठी तर ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. त्यामुळे या निवडणुकीत या प्रवृत्तीला गाडूया. लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे नाव बदलून हसन मियॉलाल मुश्रीफ ठेवण्याचे स्वप्न पाहिले. मात्र कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी बहाद्दर सभासदांनी त्यांच्या पॅनलला चिटपट करून त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले. याही निवडणुकीत त्यांना चितपट करुन स्वर्गीय मंडलिकांचे अपुरे स्वप्न पुर्ण करुया.

यावेळी स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज उपविभागाची अस्मिता असलेला गडहिंग्लज साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खाजगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा,त्यांची हुकूमशाही व दडपशाही सुरु आहे. स्वर्गीय श्रीपतराव शिंदे, विक्रमसिंहराजे घाटगे,बाबासाहेब कुपेकर व सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराची स्वाभिमानी जनता हे चालू देणार नाही. दत्तोपंत वालावलकर,उमेश देसाई, ॲड .सुरेश कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच तुकाराम भारमल यांनी केले. यावेळी आभार सचिन सुतार यांनी मानले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी