कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दिनमान आयोजित‘दिनमान साहित्य उत्सव’ पार पडला. या उत्सवात दोन दिवस साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम पार पडले. अभिजात मराठी गौरवार्थ हा उत्सव आयोजित केला होता. २५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बहारदार काव्यमैफलीत महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांनी ओघवत्या शैलीतील सूत्रसंचलनाने या काव्यमैफलीत काव्यरसिकांना बांधून ठेवले. (Dinman Kavyamaifal)
अरूण म्हात्रे यांच्यासह आभा बोधिसत्व, मोनिका सिंग, प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे, प्रशांत मोरे, संदीप माळवी, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर, डॉ. जगन्नाथ पाटील, सुमती लांडे आणि अपूर्व राजपूत यांनी सादर केलेल्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.
काव्यमैफलीत सहभागी झालेले कवी :
काव्यमैफलीची लिंक :