बोलायचा ठेका फडणवीसांनी दिला का? : मनोज जरांगे

जालना; प्रतिनिधी : लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते, ते मला माहिती आहे, ते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते का, मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. (Manoj Jarange)

मी समाज एकसंध ठेवला. त्यांच्यासारखे पक्ष काढून समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता. त्यांना हे सगळे बोलायचा ठेका देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे का, असा सवाल जरांगे यांनी केला. राज यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले, तर त्यांना विचारा, की आरक्षण कसे देणार हे आधी सांगा. (Manoj Jarange)

जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोच्र्यांचे काय झाले? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळाले? आता जरांगे- पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार, तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे, की हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, या गोष्टी तुमच्याशी अत्यंत विचारपूर्वक बोलतो. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतो. हीच सत्य परिस्थिती मी ज्या वेळी जरांगे- पाटलांना भेटायला गेलो, त्या वेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती, असे राज यांनी म्हटले होते.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ