Deven Bharti : देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Deven Bharti

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आज ३० रोजी निवृत्त झाले. देवेन भारती हे १९९४ आयपीएस अधिकारी आहेत. देवेन भारती हे मुळचे बिहारचे असून मुंबईची कमान आता ते सांभाळणार आहेत. (Deven Bharti)

फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा असतानाच देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलिस दलाची सुत्रे देण्यात आली आहेत. भारतीय यांच्याकडे दोन वर्षापासून मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त हे पद देखील आहे. (Deven Bharti)

मुंर्बचे सर्वात जास्त काळ सह पोलिस आयुक्तपद देवेन भारती यांनी काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. देवेन भारती यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला. पत्रकार जेडे यांच्या हत्येचा तपास केला होता. महाराष्ट्रात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्याचे काम त्यांनी केले होते. (Deven Bharti)

हेही वाचा :

जनगणनेत जातनिहाय सर्वेक्षण

मंदिरातील भिंत पडून आठ भाविकांचा मृत्यू

 पत्नी, मुलाची हत्या करुन सीईओची आत्महत्या

हॉटेलला लागलेल्या आगीत १४ ठार

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?