Delhi ‘godman’ exposed : दिल्लीतील ‘बाबा’चा पर्दाफाश; सीसीटीव्हीवरून भयानक चित्र उघडकीस

chaitanyanand

नवी दिल्ली : संस्थेतील विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी चौकशीसाठी नैऋत्य दिल्लीतील त्याच्या खाजगी संस्थेत नेले. चौकशीत एका कथित “टॉर्चर रूम” आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आढळले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. (Delhi ‘godman’ exposed)

चैतन्यानंद सरस्वतीचा फोन जप्त करण्यात आला आहे. तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांना तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याबद्दल पोलिसांनी त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे नेण्यात आले. त्याचे कार्यालय आणि राहण्याची जागा याची झडती घेण्यात येत आहे. तेथील पुरावे गोळा करण्यासाठी शोध घेण्यात आला.(Delhi ‘godman’ exposed)

संस्थेचा माजी संचालक असलेल्या या स्वामीने ज्या खोलीत कथितरित्या विद्यार्थिनींवर अत्याचार केले होते त्या खोलीत नेण्यात आले. सूत्रांनी सांगितले की चौकशीदरम्यान तो एकच उत्तर देत होता, ते म्हणजे, ‘‘मी माझ्या फोनचा पासवर्ड विसरलाय. मला भीती वाटते.’’

विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यासाठी या स्वामीने कथितपणे हा फोन वापरला होता. पळून जात असतानाही, त्याने त्याच्या संस्थेचे टेहळणी केल्याचे वृत्त आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनमध्ये कॅम्पस आणि हॉस्टेलच्या सीसीटीव्ही फीडचा लाईव्ह अॅक्सेस दिसत होता.(Delhi ‘godman’ exposed)

तपासात असे दिसून आले आहे की, १४ सप्टेंबर रोजी यांपैकी एका पीडितेच्या वडिलांना धमकीचा फोन आला होता. हा नंबर उत्तराखंडमधील हरि सिंह कोपकोटी (३८) याचा असल्याचे आढळून आले. त्याला त्याच्या घरातून अटक करून दिल्लीला आणण्यात आले.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार