नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एअर इंडियाच्या विमाना (AI2380) मधील एअर कंडिशनिंग आणि इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बुधवारी (१० सप्टेंबर) रात्री बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. सुमारे दोन तास प्रयत्न करूनही यंत्रणा दुरुस्त न झाल्याने प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरावे लागले. (Delhi airport chaos)
२०० हून अधिक प्रवासी या विमानात होते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बोईंग ७८७-९ ड्रीमलाइनर रात्री ११ वाजताच्या सुमारास उड्डाण करणार होते. तेव्हा तांत्रिक समस्या उद्भवल्या.
सदोष एअर कंडिशनिंग सिस्टीममुळे प्रवाशांत अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे हवा घेण्यासाठी प्रवाशांनी वर्तमानपत्रे आणि मासिकांचा आधार घेतला. (Delhi airport chaos)
या अवस्थेत सुमारे दोन तास प्रवाशी विमानातच होते. सुमारे दोन तासानंतर सर्व प्रवाशांना टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी यासंबंधीचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
दरम्यान, गुरुवारी (११ सप्टेंबर) एका निवेदनात एअर इंडियाने म्हटले आहे की, दिल्लीहून सिंगापूरला जाणारे विमान AI2380 प्रस्थानापूर्वी केबिन कूलिंग समस्येमुळे उशिरा उतरले. (Delhi airport chaos)
“प्रवाशांना विलंबाची माहिती नियमितपणे देण्यात येत होती. दिल्लीतील आमच्या सहकाऱ्यांनी विमानतळावरील प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली. अल्पोपहार आणि जेवणही देण्यात आले. विमान बदलल्यानंतर भारतीय वेळेनुसार ते ०५.३६ वाजता रवान झाले,’’ असे वृत्तसंस्था पीटीआयने एअरलाइनच्या हवाल्याने म्हटले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने खेद व्यक्त केला.